अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, औसा तालुका कार्यकारिणी जाहीर; पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण

  • Rameshwar Suryawansh (Latur)
  • Upadted: 16/07/2026 7:25 PM

जिल्हा प्रतिनिधी लातूर राजकुमार भंडे 
औसा, (लातूर)दि. १६ जुलै :
पद्मभूषण मा. अण्णासाहेब हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, लातूर जिल्हा यांच्या वतीने औसा तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष नवनाथ म्हेत्रे,तालुका सचिवआत्माराम मिरकले, तालुका उपाध्यक्ष नरसिंग सूर्यवंशी व तालुका कार्याध्यक्ष भय्यासाहेब कांबळे यांना जिल्हाध्यक्ष व जिल्हासचिव यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शक कारभार, माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची तसेच पद्मभूषण मा. अण्णासाहेब हजारे यांच्या विचारांनुसार समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमास राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे लातूर जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब नंदवे व लातूर जिल्हा सचिव रामेश्वर बाबुराव सुर्यवंशी, लातूर जिल्हा उपाध्यक्ष संजय कुंठेवाड लातूर शहर अध्यक्ष रावजी कांबळे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या