नांदेड : माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिक्षणप्रेमी नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे "डॉ. शंकरराव चव्हाण : जीवन व कार्य" या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, विचारशक्ती आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचय व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत सर्वज्ञ जाधव यांनी प्रथम क्रमांक, कु. ऋतुजा मरकुंदे यांनी द्वितीय क्रमांक, तर कु. ओजस्वी इंगळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण कल्याणकर यांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून आत्माराम कदम व अंजली राऊतवाड यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश कदम व जी. बी. मदने यांनी केले. तसेच पत्रकार गुणवंत वीरकर यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी. बी. मदने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल सवडतकर, आर. एस. खांडरे, एस. एस. डोईबळे, आर. एम. खडकीकर, नागेश बोचकरी, बी. एम. मोकमपल्ले, ए. ए. राऊतवाड, एस. एम. दापकेकर, बी. जी. आवरे, आय. एस. शेख, वाय. जी. टिप्परसे, आत्माराम कदम, आर. जी. पाटील, आर. बी. लोकरे, एस. पी. भालेराव, पी. एस. तेलंग, डी. बी. पंडीत, व्ही. डी. काळे, एन. पी. केरूरकर, पी. डब्ल्यू. लोखंडे आणि व्ही. के. कवाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना आणखी बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.