"जोपर्यंत महिला सक्षम होत नाहीत तोपर्यंत देशाचा किंवा समाजाचा संपूर्ण विकास होणे अशक्य" - समाजसुधारक अमोलभाऊ भागवत.
महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या जीवनाशी संबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी.. प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे परिपूर्ण पद्धतीने "महिला सक्षमीकरण सोहळा" श्री दत्त बॅन्क्वेट हॉल, विजयनगर, भगूर येथै पार पाडण्यात आला. घर आंगण बहुद्देशीय सामाजिक संस्था, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि स्वराज्य ग्रुप यांच्यावतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेत्या, SSBSP प्रमुख रश्मीताई भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून, आरपीआय व्हा प्रेसिडेंट प्रियदर्शिनी निकाळजे, मनपा उपायुक्त संगिता नांदूरकर, राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, मनपा नगरसेविका संजिवनी हांडोरे, उद्योजक रूपेश सलगर, भाजप नेत्या गिताताई उगले, श्री दत्त बॅन्क्वेट हॉल संचालक संजय दळवी, शिवसेना नेते संजय हांडोरे, सूनिलभाऊ सोनवणे, भनपा नगरसेवक दिपक बलकवडे, सागर चंद्रमोरे, भनपा नगरसेविका लता थापेकर, सुजाता सिरसाट, कापसाबाई साळवे, प्रमोद घुमरे, रोटरी क्लब वाईस प्रेसिडेंट प्रो. सुनीता आडके, वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष कल्पनाताई शिंदे, कौशल्या मुळाणे, नंदा भुतडा, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार नरेंद्र मोहिते, राजश्री खैरनार, नलिनी शार्दुल, सविता आहेर आदी उपस्थित होते. मनपा महापौर यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. ह्याप्रसंगी भ्र.नि.स च्या जिल्हाध्यक्ष आरतीताई भोज, घर आंगण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या आशा रमेश भोईर, अध्यक्ष, ज्योतीताई काजळे, उपाध्यक्ष अनिता पाटील, सचिव, पुनम भोईर, खजिनदार, उषाताई सुर्यवंशी, व्यवस्थापक, रुपाली पवार, जिल्हाध्यक्ष, मनिषा भूजबळ, शहराध्यक्ष आणि संजय बलकवडे, दिलीपभाऊ गायकवाड, रमेश चेवले, श्यामभाऊ डावरे, राहुल मोरे, अमित लोखंडे, विजय धिवरे, पंडित मोरे यांचे उत्तम सहकार्य लाभले.
महिलांना रोजगाराच्या संधी उद्योजकतेसाठी पाठबळ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणे, जेणेकरून त्या कोणावरही अवलंबून राहणार नाहीत यासाठी मनपा उपायुक्त संगिता नांदूरकर व MCED च्या प्रो. अधिकारी मोहिनी गांगुर्डे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
शिक्षण आरोग्य, आणि राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा व संधी मिळवून देण्यासाठी तसेच कौटुंबिक आणि सामाजिक महिलांना घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समान स्थान मिळवून देण्यासाठी मोटिव्हेशनल स्पिकर लिला हर्षद सोनवणे यांनी सोदाहरण वक्तव्य केले.
नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत यांनी आपल्या विशिष्ट शैलीत मार्गदर्शन केले.. आणि स्पष्ट केले की चॅलेंज स्वीकारणे आणि ते पुर्ण करणे याची आता आपणास सवय झालेली आहे, भगूर सारख्या गावात परिपूर्ण महिला सक्षमीकरण सोहळा घेणे आणि तो यशस्वी करणे हा देखील त्याचाच भाग आहे.
समाजात महिलांवर होणारे अत्याचार, हिंसाचार आणि भेदभावाला कायदेशीर आणि सामाजिक बळाद्वारे नष्ट करण्याची सद्यस्थितीत गरज असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा रश्मीताई भोसले यांनी सांगितले.
सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ॲड पुर्वाताई गोविल, ज्योतीताई काजळे, आशाताई भोईर, नलिनी ताई शार्दुल, आरतीताई भोज आणि सुनिताताई गांगुर्डे यांना महिला सक्षमीकरण गुणगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महिला बाल विकास, समाजकल्याण विभागाची टिम महिलांच्या सहकार्यासाठी, नोंदीसाठी हजर होती. प्रकाश खैरनार यांचेवतीने व्यासपीठावरील मान्यवरांना पुस्तके भेट करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता करण्या अगोदर महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केली गेली, कार्यक्रमात उपस्थित महिलांपैकीच पाच नशिबवान महिलांना पाच मौल्यवान भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला महिला सक्षमीकरण सोहळ्याची भेट म्हणून प्रत्येकी भेटवस्तू देण्यात आल्या त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, वह्या वाटप करण्यात आले.
या सर्व परिपूर्ण उपक्रमाचे कौतुक जवळपास सर्व राज्यातून होत आहे.