" मल्हारक्रांती " च्या रुग्णवाहिकेचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण संपन्न्

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/06/2026 1:10 PM

सांगली दि २८,
शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणाऱ्या मल्हार क्रांति बहुउददेशीय सेवा संस्थेच्या रुग्णावाहिकेचे आज दिमाखदार लोकार्पण करण्यात आले.
   मुंबईचे प्रसिद्ध उध्योजक सोमनाथ ( शेठ) माने या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते तर उपमहापौर गजानन मगदुम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
अनेक गणमान्य राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व बहुसंख्य संस्थेने नागरिक यावेळी उपस्थीत होते.
यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या अनेक समाजपयोगी कार्याचे कौतुक केले व संस्थापक तानाजी व्हनमाने यांना शाबासकीची थाप दिली.
     गरीब व सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात रुग्णवाहिका सेवा मिळावी याचसाठी हा उपक्रम राबवत असल्याचे तानाजी व्हनमाने यांनी यावेळी सांगितले. सदर सेवा ही " ना नफा, ना तोटा "  तत्वावर चालणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या