कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये स्वच्छता अभियान व वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/06/2026 2:23 PM

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृष्णा व्हॅली चेंबर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास MIDC सांगलीचे कार्यकारी अभियंता सुनील कोलप, प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, उप अभियंता व्ही. टी गायकवाड कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी सचिव चंद्रकांत पाटील, माजी उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, रमेश आरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये औद्योगिक क्षेत्रातील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. तसेच कृष्णा व्हॅली चेंबरच्या आवारात पाच वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या अभियानाला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नरहरी कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांना स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाची शपथ देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच औद्योगिक क्षेत्र स्वच्छ, हरित व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक संजय खांबे, अर्चना पवार, सूर्यकांत कदम, शंकर रकटे, रामदास चव्हाण, प्रदीप देसाई, श्रीखंडे, श्रीकांत पाटील तसेच MIDC कार्यालयाचे सुभाष आरगे, सुयोग तपकिरे, मिलिंद मदने, रमेश कांबळे, कृष्णा व्हॅली चेंबरचे व्यवस्थापक अमोल पाटील, मदन काटकर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या