काँग्रेसने मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयात केली दगड धोंड्यांची पेरणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/06/2026 8:39 PM

किनवट : राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, नीट परीक्षेचा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथे काँग्रेसचे डॉ. पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून बिरसा मुंडा चौकातून मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय कार्यालय परिसरात दगड धोंड्यांची पेरणी आंदोलन करण्यात आले.
          काँग्रेसने निवेदनाद्वारे राज्यातील वाढत्या बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त करत युवक-युवतींसाठी रोजगारनिर्मितीच्या ठोस योजना राबविण्याची मागणी केली. शेतकऱ्यांवरील वाढते आर्थिक संकट लक्षात घेऊन सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीही करण्यात आली.

तसेच NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट विस्कळीत होत असल्याने महागाई नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

आदिवासी, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी विशेष धोरण आखावे, तसेच शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक उत्तरदायी भूमिका घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.मोर्चानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शासनाने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. बेरोजगारी, महागाई, शेतकरी व आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
        मोर्चामध्ये प्रदेश सचिव धनराज राठोड, मोर्चाचे आयोजक डॉ. पुंडलिक आम्ले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुर्ती, शहराध्यक्ष गिरीश नेमानीवर,  ईश्वर चव्हाण ( पंचायत राज्य सचिव महाराष्ट्र) आदिवासी नेत्या नंदिनी टारफे,काँग्रेश नेते सुभाष राठोड, ईसरत चिखलीकर, वसंत राठोड, माधव खेडकर, (कार्यालय सचिव) अनिल बंगाळे (दिव्यांग तालुकाध्यक्ष काँग्रेस )शेषेराव चारोळे, डॉक्टर गंगासागरताई आमले,माजी सरपंच  तुकाराम भिसे, दशरथ खुडे, दिंगंबर खुडे,विजय झळके, देवानंद खुडे, किशन खुडे नामदेव आमले, राम कुसरे, दत्ता जावळे,शिवदास खुडे, प्रभाकर दर्शन्नवाड, शिवाजी बोथिंगे, माजी सरपंच माणिकराव किरवले, सरपंच सीताराम जावळे, यांच्यासह महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


प्रमुख मागण्या :
• शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
• बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगारनिर्मिती
• NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी
• पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण
• आदिवासी, महिला व वंचित घटकांसाठी विशेष विकास योजना
• शासकीय योजनांची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी

Share

Other News

ताज्या बातम्या