सेवानिवृत्ती; नव्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात;जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम; दोन दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन व मंथन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/05/2026 8:36 PM

नांदेड -  जिल्हा परिषदेच्या वतीने पुढील सहा महिन्यांत विविध विभागांतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती आणि सेवानिवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर आयोजित दोन दिवसीय मार्गदर्शनपर प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विशाल हिवरे, नियोजन विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, पंचायत विभागाचे सहाय्यक गट विकास अधिकारी हातमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
      दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन, पेन्शन व निवृत्तीवेतन विषयक माहिती, गुंतवणूक नियोजन, आरोग्य व जीवनशैली, सुरक्षितता, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना, कायदेशीर जागरूकता, आरोग्य विमा, कर्ज व आर्थिक सहाय्य तसेच निवृत्तीनंतर उपलब्ध विविध संधी याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात वित्त विभागाचे विशाल हिवरे, एसबीआय बँकेचे सतीश राऊत, निखिल लिमकर, विजय गंगवानी, डॉ. मनीषा जाधव, हरीश यादव, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुडदे, सागर कोलेश्वर, कपिल ढवळे तसेच विकास अधिकारी ज्ञानेश्वर थेटे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारचे व्यापक मार्गदर्शन व नियोजनपर प्रशिक्षण प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला सहभागी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
     या प्रशिक्षण शिबिराचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयातील अधिकारी, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी, अधीक्षक शिवसांभ चड्डु, गजेंद्र श्रीरामवार, सीएम फेलो भार्गवी मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहायक शुभम तेलेवार, कुलदीप जोशी, साईचरण मुगावे, बालाजी आवर्दे, बालाजी टोके, रणजित गजभारे, सुरज नाईक, आतुल अकेमवार, ओमकार पांचाळ आदींनी पुढाकार घेतला.
यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच जिल्हा परिषदेचा लोगो असलेला कप भेट म्हणून देण्यात आला.
*चौकट*
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेने आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत अभिनव आणि प्रेरणादायी ठरला. अशा प्रकारचे नियोजनबद्ध मार्गदर्शन करणारी राज्यातील पहिलीच पुढाकार असल्याची भावना सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
*चौकट*
*दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण शिबिर २५ व २६ मे रोजी*
पुढील सहा महिन्यांत विविध विभागांतून सेवानिवृत्त होणाऱ्या उर्वरित १२५ कर्मचाऱ्यांसाठी दिनांक २५ व २६ मे रोजी जिल्हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तरी संबंधित कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या