नांदेडमध्ये अवैध वाळू विरुध्द मोठी कारवाई;पोलीस उप महानिरीक्षक पथकाकडून 87 लाख रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 29/04/2026 3:48 PM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर अवैध रेती विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकास नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कल्हाळ शिवारात पाठविले होते.

सदर पथकाने, दिनांक 28/04/2026 रोजी रात्री 23.00 वाजता मौजे कल्हाळ शिवारातील वाळू धक्कयावर कारवाई केली असता, सदर ठिकाणी इंजिन बोटच्या माध्यमातून नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याचे व सदर वाळू एका फायबर बोटीतून नदीकिनारी आणली जात असल्याचे निदर्शनास आले. सदर कारवाईत पथकाने, तीन इंजिन बोट, एक फायबर बोट, वाळूने भरलेले 34 तराफे यांच्यासहित, भारत बेंज कंपनीचा एक हायवा, एक JCB मशीन व नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली (60) ब्रास वाळू, असा एकूण 87 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नमूद प्रकरणात चार आरोपींस ताब्यात घेवून, त्याचेविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं 467/2026 कलम 303 (2), 3(5) भा.न्या.सं. सह कलम 48 (7), 48 (8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा तपास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोहेकॉ / भोकरे हे करत आहेत.

सदर कारवाईमुळे, मिळालेल्या खात्रीशीर बातमी प्रमाणे, कल्हाळ येथील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकों / कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. मागील काही दिवसांपासून सदर पथकाने अवैध व्यवसायांच्या विरुद्ध उल्लेखनीय व धाडशी कामगिरी केली असून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र दिनापासून अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम दिनांक 1 मे पासून, नांदेड परिक्षेत्रात

अवैध व्यवसायांचे विरोधात पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम ही दिनांक 1 ते 31 मे दरम्यान सुरू राहील. या मोहिमेत, परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

' खबर' हेल्पलाइन चा वापर करा अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचाविता यावी, या

दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या