नांदेड शहरात मटका अड्डयावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाड; 13 आरोपींविरुद्ध कारवाई, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/04/2026 8:35 PM

नांदेड :- नांदेड परिक्षेत्रात कार्यरत असलेल्या अवैध व्यवसायविरोधी पथकास, नांदेड शहरातील पोलीस ठाणे वजिराबाद हद्दीत मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

सदर माहितीवरून, आज दिनांक 28/04/2026 रोजी, पथकाने नांदेड शहरातील कलामंदिर बसस्थानकाचे बाजूस एका शेडमध्ये छापा टाकला असता, सदर ठिकाणी मटका खेळताना (9) इसम मिळून आले. यातील सर्व इसमांना ताब्यात घेऊन, तपासणी दरम्यान, त्यांच्याकडून 37,600/- रुपयांची रोकड, 26,500/- रुपयांचे (7) मोबाईल व 28,000/- रुपयांचे संगणक असा एकूण 92,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर पथकाने ताब्यातील इसमांना मटका मालकांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदर मटक्याचे मालक हे 1) कमल यादव, रा. दिलीपसिंह कॉलनी, नांदेड 2) अन्वर शेख, रा. समीराबाग, खडकपुरा, नांदेड 3) माधव भुसेवाड, रा. शिवशक्तीनगर, मिलरोड नांदेड व 4) राजेश शर्मा, रा. कलामंदिर नांदेड हे असल्याचे सांगितले. सदर मटका खेळणारे व मटका मालकांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाणे येथे गुरनं 204/2026 कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदवून, त्याचा तपास वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोहेकॉ / गणपत शेळके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ / प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ गणेश धुमाळ व पोकों / कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.

'खबर' हेल्पलाइन वरून माहिती द्या: परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस

उप महानिरीक्षक कार्यालयाने 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेल्या 'खबर' या हेल्पलाइन वर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या