मनपा प्रशासनाकडे २०२२ साली दिलेल्या तक्रारीवर अजुन उत्तरच नाही : स्वप्निल खोत, सामाजिक कार्यकर्ते

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/04/2026 11:54 AM

महापालिका प्रसासन कडे 2022 दिलेल्या तक्रारीवर अजून उत्तर नाही व प्रगती नाही 
ह्यांना कुपवाड मधील जिल्हा परिषद ताब्यातील शाळा बंद करून जागा हडपण्याचा डाव दिसत आहे.

स्वप्निल खोत.
सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------------------------

28 April 2022 ची तक्रार

मा आयुक्तसो,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
विषय-महापालिका शाळा मधील विद्यार्थ्यांना यांना देण्यात येणाऱ्या मोफत साहित्य बाबत
महोदय,
सांगली मिरज आणी कुपवाड शहर महापालिका हद्दीतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुस्तके आदी साहित्य देणार आहात हा उपक्रम खूपच छान आहे  त्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत  
पण महापालिका हद्दीतील कुपवाड शहरात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत कुपवाड मधील बहुसंख्य मुले ही जिल्हा परिषद शाळे मधे शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद शाळा त्याब्यात घेण्याचे आपल्या स्थायी समिती मध्ये ठराव होऊन 24 वर्षे झाली त्या ठरावाची अंमलबजावणी अजून पर्यंत का झाली नाही?
हा  एक संशोधनचा विषयच आहे.
यामुळे कुपवाड शहरातील मुले जी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर  कुपवाड मधील नागरिक कर भरणारे  यांचेवर अन्याय तर होत नाही ना!
कुपवाड नागरिकांनी फक्त कर भरायचे पण प्रत्येक कामात सुविधा देण्यात कुपवाडवर कायम दुजाभाव केला जातो 
त्यामुळे कुपवाड मधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ही महापालिका शाळेतील देण्यात येणारी सुविधा मिळावेत
स्वप्नील खोत कुपवाड सामाजिक कार्यकर्ते

Share

Other News

ताज्या बातम्या