नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारणी बरखास्त;डिजिटल मीडियाच्याही कंधार, देगलूर वगळता सर्व तालुका कार्यकारणी नव्याने होणार, बरखास्त झालेल्या सर्व तालुका कार्यकारणींचे नव्याने गठन होणार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/04/2026 4:24 PM

नांदेड - नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माहूर आणि अर्धापूर तालुका कार्यकारणी वगळता जिल्ह्यातील इतर सर्व तालुका कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मान्यतेने आणि जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे, कार्याध्यक्ष अनिल कसबे यांच्या आदेशान्वये हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या सर्व तालुका कार्यकारणी नव्याने गठीत करण्यात येतील, अशी माहिती पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी दिली आहे.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे वेगवेगळे प्रश्न सोडविले जातात. जिल्हा पत्रकार संघाच्या अर्धापूर आणि माहूर तालुका कार्यकारणी वगळता इतर सर्व तालुका पत्रकार संघाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या या सर्व तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात येणार आहेत. जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे आणि कार्याध्यक्ष अनिल कसबे यांच्या आदेशानुसार या सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. 
नव्याने गठित झालेली अर्धापूर आणि माहूर तालुका कार्यकारणी या निर्णयातून वगळण्यात आली आहे. बरखास्त झालेल्या सर्व तालुका कार्यकारणींचे नव्याने गठन करण्यात येणार आहे. नव्या कार्यकारिणीचे जिल्हास्तरावरून निरीक्षक पाठवून गठन करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरील जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या कार्यकारिणी निवडण्यात येतील, असेही जिल्हाध्यक्ष पांडागळे यांनी सांगितले. त्याचवेळी नांदेड जिल्हा डिजिटल मीडियाच्या देगलूर आणि कंधार या तालुका कार्यकारणी वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये नव्याने कार्यकारणी गठीत करण्यात येणार आहेत. यासाठीही जिल्हास्तरावरून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी दिली. 
जिल्हा पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारणी तसेच डिजिटल मीडिया कार्यकारणी निवडी लवकरच करण्यात येणार आहेत. त्याचवेळी जिल्हा पत्रकार संघाची सदस्य नोंदणीही लवकरच सुरू केली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी याची नोंद घ्यावी, त्याच वेळी कार्यकारणी बरखास्त करण्यात आलेल्या तालुका कार्यकारिणी कोणत्याही स्वरूपात कार्यरत राहणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरून लवकरच तालुका कार्यकारणी निवडण्यासाठी निरीक्षकांची घोषणा केली जाईल, असेही जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी सांगितले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या