जनआक्रोश : कोल्हापूर रोड की मृत्युचा सापळा ?, सुधरा.... अन्यथा आंदोलन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2026 1:59 PM

​सांगलीचा कोल्हापूर रस्ता बनलाय खड्ड्यांचे साम्राज्य! सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की आहे तरी कुठे?
​शास्त्री चौक ते फळ मार्केटपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, हेच आता समजेनासे झाले आहे. या जीवघेण्या रस्त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत, मात्र प्रशासन अद्याप सुस्त आहे.
​आमचे रोकठोक सवाल:
​सार्वजनिक बांधकाम विभाग 'कोमात' आणि अधिकारी 'जोमात' का?
​नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार?
​रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रशासन आणखी किती बळींची प्रतीक्षा करत आहे?
​📢 लोकहित मंच, सांगलीचा इशारा!
​जर तात्काळ खड्डे मुजवले नाहीत आणि रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले नाही, तर लोकहित मंच खालील पावले उचलणार:
​१) खड्ड्यांची 'सप्रेम भेट': कोल्हापूर रस्त्यावर जे जीवघेणे खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्यांचे फोटो काढून, त्यांची फ्रेम करून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना 'सप्रेम भेट' म्हणून दिली जाईल. जेणेकरून प्रशासनाचा हा 'विकास' त्यांना जवळून पाहता येईल!
​२) पालकमंत्र्यांना घेराव: जनतेच्या प्रश्नांवर उत्तर मिळेपर्यंत पालकमंत्र्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल.
​३) भव्य सह्यांची मोहीम: प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर रोड परिसरात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येईल.
​"आम्ही फक्त कर भरण्यासाठी नाही, तर सुरक्षित रस्त्यांवर चालण्यासाठीही आहोत. प्रशासनाने आपली कुंभकर्णी झोप सोडावी, अन्यथा लोकहित मंच स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल!"
.
​विनीत,
मनोज भिसे,
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली 🚩

Share

Other News

ताज्या बातम्या