महिलांना साहाय्य व मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करणारे जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 19/04/2026 8:57 PM

नांदेड :- केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे तसेच महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र  कार्यरत आहे. जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्राचे कार्य महिलांसाठीच्या शासकीय कृतीमधील त्रुटी दूर करणे व यासाठी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या प्रक्रिया बळकट करणे, सामाजिक बदलासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि महिलांना शासकीय योजनांचा अधिक चांगला वापर व उपलब्धता मिळवून देणे. 

महिला सक्षमीकरण केंद्राचे उद्दिष्ट माहितीतील तफावत दूर करणे, जनजागृती मोहीम राबवणे, समान व्यासपीठ तयार करणे आणि महिलांना विविध गटांमध्ये संघटित करणे. शोषण आणि भेदभाव दूर करून महिलांना सक्षम करणे आणि त्यांना संसाधने व निर्णयांमध्ये त्यांचा योग्य वाटा मिळेल याची खात्री करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. मुली, किशोरवयीन मुली आणि ज्येष्ठ महिलांसह समाजातील सर्व स्तरांतील महिलांपर्यंत पोहोचणे आणि विविध हितधारक गटांच्या सहभागातून, बालिका, किशोरवयीन मुली आणि सर्व वयोगटातील महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल हे  या केंद्राचे ध्येय आहे.

हे केंद्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत, महिला व बालविकास भवन, महात्मा फुले मार्केट च्या बाजूला, गणेश नगर रोड, नांदेड येथे  सुरु आहे. ह्या केंद्राने आता पर्यंत पूर्ण नांदेड जिल्यातील तालुका व ग्रामपंचायत ठिकाणी जावून १८९ जनजागृती कार्यकर्म घेऊन कार्यक्रमात सहभागी महिला, मुली व उपस्थित सर्व व्यक्तीना केंद्र व राज्य शासनाद्वारे महिला व बालकांबाबत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच महिला हेल्पलाईन 181, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ समिती गठीत करणे ,she Box portal इत्यादी संदर्भात मुलींना आणि महिलांना माहिती पुस्तिका देऊन मार्गदर्शन केले. तसेच 1098 चाईल्ड लाईन, बालसंगोपन योजनांची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांची विविध माहिती, मिशन शक्ति मोबाईल app ,बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, अश्या ई. विषयीची माहिती पुस्तिका देऊन प्रचार प्रसिध्दी करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या