नांदेड :- नांदेड तालुक्यात शासकिय कामे प्रामुख्याने तात्काळ निकाली काढण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारनसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांच्या अध्यक्षेखाली तालूक्यातील सर्व तालुका स्तरीय अधिकारी,तालूका कार्यालय प्रमुख विभाग यांचा महत्वाच्या विषयावर आढावा घेतला व अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या.विशेषता मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते, अन्न नागरी पुरवठा, सामाजिक सुरक्षा योजना,पाणी टंचाई,SIR, वीज पुरवठा , कृषी विषयक बाबी,खत बी बियाणे पुरवठा,छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व शिबिर अभियान,नैसर्गिक आपत्ती अनुदान,विशेष सहाय्य अनुदान वाटप,ई फेरफार,जलजीवण पाणीपुरवठा,महावितरण,कायदा व सुव्यवस्था अदि विषयावर आढावा घेतला दोन्ही आमदार महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगले व व्यवस्थित काम करण्याची सूचना दिली नांदेड तालुक्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये असे पहावे व इतर काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे सांगितले.बैठकिस उप विभागीय अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ,तहसिलदार नांदेड संजय वारकड,उप विभागिय पोलिस अधिकारी नांदेड शहर,इतवारा ,गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर,उप अधिक्षक भूमिअभिलेख,मृदणव जलसंधारण,तालूका कृषी अधिकारी,पुर्णा पाटबंधारे ,ग्रामीण पाणी पुरवठा,गट शिक्षण अधिकारी,पोलिस निरिक्षक शिवाजीनगर,लिंबगांव,नांदेड ग्रामिण,इतवारा,विमानतळ,नायब तहसिलदार सुनिल माचेवाड,संजय नागमवाड,नितिशकुमारनबोलेलू,इद्रजित गरड व तालूक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.