डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची देशाला गरज : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2026 3:22 PM


 *लोकहित मंचच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

 सांगली प्रतिनिधी 
     जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे जनक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी दलित वर्गासाठी आपले आयुष्य वेचले आणि गरिबातील गरिबापासून ते श्रीमंतातील श्रीमंता पर्यंत सर्वांसाठी एकच कायदा निर्माण करून, विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. आज जरी आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरत असलो आणि ए आयच्या युगात आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व  शिकवणीची आवश्यकता आणि गरज आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केली.शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज लोकहित मंचच्यावतीने सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
       भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत व सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
      यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी,  सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, मंगल प्रवाह शिक्षण संस्थेचे संस्थापक अभिमन्यू भोसले, सामाजिक कार्यकर्ते अबूबकर तहसीलदार, ज्येष्ठ नागरिक बाबालाल जमादार,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक  नाईक, विलास कांबळे, सागर लोंढे, राहुल लोंढे, अर्जुन चौगुले लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या