महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाची महत्त्वाची सूचना

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/04/2026 6:02 PM

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ संदर्भात एक महत्त्वाची सुधारित सूचना जाहीर करण्यात आली आहे.
या सूचनेनुसार, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांनी दि.१३ एप्रिल, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित यादीतील महाविद्यालयांनी संलग्नीकरणाचे नूतनीकरण प्रस्ताव व शुल्क विद्यापीठाकडे सादर केलेले नाही. अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित महाविद्यालयांनी या सूचनेचे पालन न केल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान (उदा. पात्रता, परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, परीक्षा प्रवेशपत्र दिले जाणार नाही, निकाल जाहीर केला जाणार नाही इ.) यासंबंधीची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, पालक व महाविद्यालय प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.srtmun.ac.in वर “Circular-Affiliation” या विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थी व पालकांनी प्रवेश घेताना संबंधित महाविद्यालयाच्या संलग्नीकरण स्थितीची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या