सांगलीकरांच्या मनातील प्रखर भावना खऱ्या अर्थाने कोण समजून घेणार?
भा.ज.पा, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस—या सगळ्या पक्षांनी खरंच जनतेच्या अपेक्षांना न्याय द्यायचा आहे का?
की पुन्हा एकदा राजकीय, सामाजिक कार्यात शून्य टक्के योगदान असलेल्या धनदांडग्यांनाच स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाणार?
आज मी एका अशा व्यक्तीबद्दल बोलतोय,
जो निस्वार्थी आहे, जनतेप्रती प्रामाणिक आहे—सतीश साखळकर...
राजकारणाच्या पलीकडे जाऊन,
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर थेट प्रशासनाला भिडणारा,
जनतेसाठी झटणारा, सेवाभावी चेहरा.
त्यांच्या कामांची यादी मांडायची झाली,
तर ही पोस्टच अपुरी पडेल...
कारण एक महापौर किंवा नगरसेवक जितकं योगदान देतो,
त्यापेक्षा अनेकपटीने साखळकर यांनी स्वतःला जनतेसाठी झोकून दिलं आहे.
जर पक्षांनी खरंच सांगलीकरांच्या मनातील आवाज ऐकला,
तर सतीश साखळकर यांना संधी देणं म्हणजे त्या पक्षाची प्रतिमा उंचावणं ठरेल...
पण प्रश्न अजूनही तसाच आहे
निवडणुकीपूर्वी आश्वासनं देऊन, गरज संपली की विसरण्याचं राजकारण चालूच राहणार का?
अराजकीय, कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्त्याला खरी संधी मिळणार का?
उत्तर कदाचित “नाही” असू शकतं…
पण प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे
एका खऱ्या सामाजिक नायकासाठी...
👉 तुमचं मत काय? नक्की कमेंट करून व्यक्त व्हा....
युनूस महात,
सांगली