शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे-खा.भास्करराव भगरे
नाशिक:- विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्राला आकार देणारे संस्कार शाळा-महाविद्यालयांतून दिले जातात. त्यातूनच सक्षम नागरिक घडत जातो. म्हणूनच शिक्षण प्रक्रियेत शासन आणि समाजासह शिक्षकांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन दिंडोरीचे खा.भास्करराव भगरे यांनी केले.
रावसाहेब थोरात सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना गौरविण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खा.भगरे बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, महाराष्ट्र समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुधाकर साळी, निवड समितीचे अध्यक्ष शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, सदस्य अरुण पवार, बाळासाहेब ढोबळे, निंबा कापडणीस, विनीत पवार, दादाजी अहिरे, संजय पाटील, बाळासाहेब भोसले, एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीच्या अध्यक्षा विजया पाटील, उपाध्यक्ष संग्राम करंजकर, संचालक मंडळ, प्राचार्य किशोर जाधव, नाना खैरनार, रामदास गडकरी, कल्पेश चव्हाण, संजय पवार, निलेश ठाकूर, रघुनाथ गायकवाड, एन.डी.मुसळे, लक्ष्मण मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते प्राचार्य के.के.अहिरे स्मृती जीवनगौरव पुरस्कार व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, आदर्श संस्था पुरस्कार महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ, आदर्श शाळा पुरस्कार सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित देवळाली हायस्कूल यांच्यासह विविध शाळांमधील गुणवंतांना गौरविण्यात आले. अजय बोरस्ते, ॲड.नितीन ठाकरे, प्राचार्य साहेबराव कुटे, किरण माऊली पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कारार्थींच्या वतीने मोहन चकोर, अवधूत खाडगीर यांनी सत्काराला उत्तर दिले. गुणवंतांसह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संयोजक संग्राम करंजकर यांनी प्रास्ताविक केले. समीर जाधव यांनी आभार मानले.
*_यांचा झाला सन्मान:_*
_उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार अशोक नंदन,पेठ, ज्ञानेश्वर ठाकरे, चांदवड, सुनीता पगार, देवळा (माध्यमिक विभाग), सुनील बिरारी, नाशिक (प्राथमिक विभाग), केशव रौंदळ, कनाशी (आश्रमशाळा विभाग), अफजल आजमी, मनमाड (उर्दू माध्यम), साहित्य क्षेत्र : काशीनाथ गवळी, पिंपरखेड,नांदगाव, सामाजिक क्षेत्र : राहुल दवते,निफाड, राजकीय क्षेत्र : वैशाली दाणी, नाशिकरोड, सहकार क्षेत्र : मोहन चकोर, शिवरे, आध्यात्मिक व समाजप्रबोधन क्षेत्र : हभप नरेंद्र महाराज गुरव, मालेगाव, संघटन क्षेत्र : भाऊसाहेब शिरसाट, गंगापूर, पत्रकारिता : भगवान हिरे, सारताळे, नांदगाव, नाट्य-नृत्य : बापू गोविंद, नाशिकरोड, संगीत : प्रशांत महाबळ, सातपूर, महिला सबलीकरण : साधना पाटील, नाशिक, विज्ञान व तंत्रज्ञान : काकाजी भामरे, देवळाणे, बागलाण, तंत्रस्नेही व्यवसाय शिक्षण : अनिल भंडारे, नाशिक, चित्रकला : सुनील लाड, सटाणा, क्रीडा (शहरी) : यशवंत ठोके,नाशिक, क्रीडा (ग्रामीण) : गणपत सदगीर, सुरगाणा, स्काऊट : बापू चतुर,सिन्नर, गाईड : अरुणा खरे, सटाणा, उपक्रमशील शिक्षक आदिवासी विभाग (शासकीय) : कांतीलाल जाधव, बोरीपाडा, त्रंबकेश्वर, आदिवासी विभाग (अनुदानित) : उमेश खैरनार, पळासदरे, मालेगाव, दिव्यांग क्षेत्र : ज्योती देसले, झोडगे, एनसीसी राजेश चव्हाण, चांदवड, पर्यावरण : प्रदीपसिंग पाटील, नाशिक, शिक्षकेतर कर्मचारी (शहरी) : अविनाश रहाणे, नाशिक, शिक्षकेतर कर्मचारी (ग्रामीण) : बाळासाहेब मोरे, येवला, चतुर्थश्रेणी कर्मचारी : सुखदेव जाधव, वाहेगाव, बागलाण, प्रयोगशाळा सहाय्यक : महेंद्र बच्छाव, सायने, प्रयोगशाळा परिचर : काशीनाथ कावळे, राजारामनगर, दिंडोरी, ग्रंथपाल : दीपाली रसाळ, नाशिकरोड, अंगणवाडी सेविका : सुषमा देशमुख, भगूर, उपक्रमशील शिक्षक प्राथमिक विभाग-कैलास पवार, पंचवटी, उपक्रमशील शिक्षक जिल्हा परिषद शाळा-अवधूत खाडगीर, भरविर, रूपाली कराड, खेरवाडी, शिक्षकेतर कर्मचारी आश्रमशाळा-सचिन हरिश्चंद्र, करंजी, विशेष पुरस्कार प्रा.डॉ.कृष्णा शहाणे, नाशिक, विशेष पुरस्कार : गोरख कुनगर, गांधीनगर, मनोज मोगरे, दिंडोरी, संजय काळे, खडकेद, सुनीता सोनवणे, नाशिक, पोपट विश्वास, देवळा, सुनील बस्ते, नाशिक, ललिता भामरे, देवळा._