भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शास्त्री चौक, सांगली येथे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य १४ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास भीमरावजी आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष, समिती सैनिक दल) तसेच माजी क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमास उपस्थित राहून महामानवांच्या विचारांना अभिवादन करत, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी अधिक दृढ झाला.
यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील,भाजपा नेते पृथ्वीराज(बाबा) पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे, सांगली महानगरपालिका महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, योगेंद्र थोरात, मौनुद्दीन बागवान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अध्यक्षा सौ.स्नेहलताई सावंत, आदी मनपा नगरसेवक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सांगलीतील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.