पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धेत: कोल्हापूर ,नाशिक अमरावती व नागपूर विद्यापीठ संघाची आगेकूच, नेत्रदीपक कौशल्याने प्रेक्षक अचंबित

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/04/2026 7:36 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मैदानावर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो (पुरूष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक.,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर संघाने  प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवून आगेकूच केली आहे.खेळाडूंची चपळाई, चकवा,खो देणे आदी नेत्रदीपक कौशल्याने प्रेक्षक अचंबित झाले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या मैदानावर आयोजित खो खो (पुरूष) स्पर्धेत पश्चिम विभागातील ५ राज्यातील संघाचा सहभाग आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन, कुलसचिव डॉ.डी.डी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.भास्कर माने यांनी उत्तम नियोजन केले आहे. दि.४ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात खेळाडूंनी आपल्या विद्यापीठाला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.                      यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संघातील अतुल भोसले, अभिषेक भोसले, कुणाल पाळे आदी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.त्यामुळे पारुळ विद्यापीठ, वडोदरा संघावर २ गुणांनी मात केली.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर संघावर ३ गुणांनी मात केली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने लक्ष्मीबाई राष्ट्रीय शा.शि. संस्था, ग्वाल्हेर संघावर २ गुणांनी मात केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर संघाने गुजरात विद्यापीठ, गांधीनगर संघाचा एकतर्फी असा १८ गुणांनी पराभव केला.
महाराजा सयाजीराव विद्यापीठ,बडोदा संघाने राजस्थान विद्यापीठ राजस्थान संघाचा पराभव केला.श्री गुरू गोविंद गुरू विद्यापीठ , गोध्रा  व एपीएस विद्यापीठ,रेवा( मध्यप्रदेश) संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात केली. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी खेळाडूंचा पाठलाग, हुलकावणी, पोल मारणे, लागोपाठ खो देणे आदी कौशल्याने उपस्थित प्रेक्षक अचंबित झाले.

Share

Other News

ताज्या बातम्या