सांगली : सांगली जिल्ह्यातील साई परदेशी या क्रिकेट खेळाडूने बीसीसीआय अंतर्गत झालेल्या कुच बिहार क्रिकेट स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळताना उत्कृष्ट परफॉर्मन्स केला आणि याच परफॉर्मस च्या जोरावर साई परदेशी याची पॉंडेचरी येथे होणाऱ्या नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) कॅम्प साठी निवड झाली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार माननीय संजय बजाज साहेब यांनी साई याचे विशेष कौतुक केले व त्याला शुभेच्छा दिल्या.
साई परदेशी हा गेली आठ वर्ष बी सी सी आय लेव्हल १ क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी व पलूस येथे क्रिकेट चा कसून सराव करत होता.
साई याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार व सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा. संजय बजाज साहेब,मा.सी.के पवार , मा किशोर शहा, टूर्नामेंट कमिटीचे सदस्य निलेश शहा, सागर पेंडूरकर व पोलाइट क्रिकेट क्लब चे मार्गदर्शन लाभले.