सांगली मनपा आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावतीला बदली, संजिता मोहपात्रा सांगलीच्या नव्या आयुक्त

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/04/2026 9:12 PM


राज्य शासनाने आज प्रशासकीय फेरबदल करत सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी (IAS) यांची बदली केली आहे. त्यांची नियुक्ती आता अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने आज यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले. सत्यम गांधी हे अमरावती येथे श्रीमती संजीता मोहपात्रा यांची जागा घेतील.श्रीमती संजीता मोहपात्रा यांची नियुक्ती सत्यम गांधी यांच्या जागी, म्हणजेच सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. शासनाने गांधी यांना आपल्या पदाचा कार्यभार सोपवून तातडीने नवीन पदावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. बदलीच्या प्रक्रियेनंतर 'सुप्रीम' प्रणालीवर माहिती अपडेट करण्याच्या सूचनाही सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. या बदलीमुळे आता सांगली महापालिकेला संजीता मोहपात्रा यांच्या रूपाने नवीन आयुक्त मिळाले आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या