साताऱ्यात ४ एप्रिलला वाहतूक बदल; जिल्हा परिषद सभेमुळे निर्बंध

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 03/04/2026 9:58 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे )

सातारा दि:रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनान े हा निर्णय घेतला आहे. बंदी असलेला मार्ग :

४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका मार्गावरील जिल्हा परिषद चौक ते बांधकाम भवन चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग :

बॉम्बे रेस्टॉरंटकडून शिवाजी सर्कल / पोवई नाका जाणारी वाहने जिल्हा परिषद चौक - अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल - कोषागार - जिल्हा न्यायालय मार्गे वळवली जातील.

शिवाजी सर्कल/पोवई नाका कडून बॉम्बे रेस्टॉरंटकडे येणारी वाहने बांधकाम भवन - आरटीओ - सैनिक स्कूल - जिल्हा परिषद चौक मार्गे जातील.
एसटी बससाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
पार्किंग व्यवस्था :सभेसाठी येणाऱ्य ा सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बांधकाम भवन शेजारील जिल्हा परिषद मैदानातच वाहन पार्क करावीत.
इतर निर्बंध :बांधकाम भवन चौक ते जिल्हा परिषद चौक तसेच आरटीओ चौक परिसरात रस्त्यावर हातगाडे, फळ व खाद्यपदार्थ विक्रीस मनाई राहणार असून, या मार्गावर कोणतेही वाहन पार्किंगला परवानगी दिली जाणार नाही.
पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या