महापौर धीरज सूर्यवंशी यांची कुपवाडमधील विविध विकासकामाची प्रत्यक्ष स्थळी पहाणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/03/2026 11:13 PM


आज कुपवाड शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पाहणी केली. ही सर्व कामे दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. कुपवाडचा कायापालट करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यावेळी कुपवाडकर नागरिकांनी जो जिव्हाळ्याचा नागरी सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांच आभार मानले. तुमचे हे प्रेम आणि विश्वासच मला जनसेवेसाठी अधिक ऊर्जा देतो! अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
याप्रसंगी उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेविका मालुश्री महावीर खोत व नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या