नांदेड :- माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मुदखेड तालुक्यातील वाईच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
वाईचे माजी सरपंच गोविंदराव पाटील शिंदे यांच्या पुढाकारातून सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रामराव इंजेवाड, माजी सरपंच राजेश इंजेवाड, महेंद्र गिरी, दिलीप पाटील तिडके, ज्ञानेश्वर शिंदे, व्यंकटराव पाटील पवार, बालाजी पेंटेवाड, बालाजी तोटेवाड, गोविंदराव पाटील जाधव, माणेजी पाटील तिडके, मस्तानसाब पठाण, देवराव पाटील काळे, आनंदा हानवते, राहुल सोनकांबळे, शंकरराव हानवते, बी. जी. राठोड, केशव पाटील ढगे, उद्धव पाटील हंबर्डे, सुनील वाघमारे, भगवान हानवते आदींनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी वरिष्ठ नेते गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, मुदखेडचे भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील कल्याणे, रोहिदास जाधव, मारोती पाटील शंखतीर्थकर, केशव मुंगल आदी उपस्थित होते.