नांदेड :- नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीची सत्ता आल्यानंतर महपौरांनी १०० दिवसांचा कृती आराखडा प्रसिध्द केला होता त्या आराखड्याची पहिली वचनपुर्ती सोमवार दि.३०.०३.२०२६ रोजी करण्यात आली. *महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण* यांच्या शुभहस्ते या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. *"नांदेडला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्यासाठी पाणी, स्वच्छता आणि डिजिटल सेवा या त्रिसूत्रीवर आम्ही भर देत आहोत," असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.*
खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कौठा भागातील रवि नगर येथे २४×७ पाणी पुरवठा योजनेचा प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे आता या परिसरातील नागरिकांना चोवीस तास आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे. *"शहरातील प्रत्येक घराला शुद्ध आणि निरंतर पाणी मिळावे, हे आमचे उद्दिष्ट आहे," असे प्रतिपादन यावेळी चव्हाण यांनी केले.* केंद्र शासन पुरुस्कृत अमृत २.० योजने अंतर्गत या योजनेचे काम हाती घेण्यात आले असुन कौठा भागात २ कि.मी. जलवाहीणी नव्याने टाकुन एकुण १४१४ मालमत्ता धारकांना Ultraasonic Water AMR Meter बसवुन २४×७ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या यशस्वी प्रयोगानंतर ही योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात राबवली जाणार आहे.
तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात खासदार चव्हाण यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक स्वच्छता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक स्वच्छता वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये स्वच्छता विभगासाठी दोन स्विपींग मशीन व मलनिस्सारण विभागासाठी एका वाहनाचा समावेश असून त्यात जेटींग, गल्फर व रिसायक्लींगचा समोवश असणार आहे, या अत्याधुनिक मशिनचा व्हॅक्यूम क्लीनरव्दारे मुख्य रस्त्यावरील स्वच्छता जलद गतीने होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे जेटींग कम सक्शन मशीन वाहनामुळे मॅन होल व ड्रेनेज लाईनची स्वच्छता तातडीने होण्यास मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे प्रशासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम' (RTS) अंतर्गत महापालिकेच्या ७४ सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या सेवांच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या 'अविरत कक्षा' चे उद्घाटनही खासदारांच्या हस्ते करण्यात आले. आता नागरिकांना पालिकेत न येता घरबसल्या विविध दाखले आणि परवाने मिळवता येणार आहेत.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शिका पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असुन नागरिकांसाठी नाविण्यपूर्ण Whatsapp Chatboat व्दारे भ्र.क्र.7888280000 या क्रमांकावर सेवा देण्यात येणार आहे.भविष्यात शासनाच्या विविध विभागांच्या अधिसुचित सेवा सुध्दा महापलिकेच्या अविरत केंद्रातुन देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सांगितले.
हा प्रकल्प केवळ नळातून पाणी येण्यापुरता मर्यादित नाही, तर तो नांदेडकरांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणारा एक क्रांतिकारी टप्पा आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेने अद्यावत तंत्रज्ञान आणि नविन जलवाहिन्यांचे जाळे विस्तारले आहे. आज या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण या बदलाचे साक्षीदार आहोत. या योजनेचा लाभ घेताना आपण सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन यावेळी *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले.
या सोहळ्या प्रसंगी *खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह महापौर तथा भाजपा महानगरध्यक्ष अमरनाथ राजुरकर, सौ. कविता संतोष मुळे, उपमहापौर दिपकसिंग रावत, सभागृह नेते ॲड.महेश कनकदंडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपसभापती निरंजना लांडगे* यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच नगरसेवक अभिषेक सौदे, दिपाली संतोष मोरे, सुलोचना धोंडीबा काकडे, अनुराधा राजु काळे, संजय घोगरे, सुवर्णा सतिष बस्वदे, वैजनाथ देशमुख, मंगला गजानन देशमुख, साहेबराव गायकवाड, स्विकृत सदस्य दिलीप कंदकुर्ते, अमित तेहरा, डॉ.अंकुश देवरकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, स.अजितपालसिंघ संधु, नितीन गाढवे, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकळीकर, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, सिस्टिम मॅनेजर सदाशिव पतंगे, उपअभियंता प्रकाश कांबळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे व विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.