नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.२३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत, स्थायी सभागृह येथे शहीद दिना निमित्त शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस *सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपा *आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सुध्दा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
भारतात दरवर्षी २३ मार्च हा दिवस 'शहीद दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी, म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तीन महान क्रांतिकारक भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू आणि सुखदेव थापर यांना ब्रिटिश सरकारने लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली होती. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहतो. हा दिवस तरुण पिढीला देशभक्ती, त्याग आणि धैर्याची प्रेरणा देतो.
याप्रसंगी नगरसेवक आशिष नेरलकर,सुमित मुथा,नगरसेविका कविता गड्डम, सरीता बिरकले, निरंजना लांडगे, संध्या देमगुंडे, ठाकुर अमृता, मनप्रितकौर कुंजीवाले, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु,वैद्यकिय अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे,यांच्यासह मनपातील इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.