देवळालीत झुलेलाल जयंती उत्साहात साजरी .
प्रतिनिधी l देवळाली कॅम्प :- मानवतेचे प्रतीक असलेले संत झुलेलाल महाराज यांच्या जयंती धार्मिक कार्यक्रमांनी साजरी .
सिंधी बांधवांचा पवित्र चेट्रीचंड उत्सव व त्यानिमित्ताने
सिंधू सेवा मंडळाच्या वतीने येथील जुने बस स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते झुलेलाल महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, सिंधी पंचायतीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष उद्धवदास बोधानी, यांनी झुलेलाल जयंतीनिमित्त सर्व धर्मीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्छाव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर, भगूर नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे, नगरसेवक विशाल बलकवडे, भाऊसाहेब धीवरे, ज्ञानमंदिर समितीचे संजय भालेराव, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष सायरा शेख, मनसे शहराध्यक्ष संदीप चौधरी, बाळासाहेब गोडसे, राशीद सय्यद, जहांगीर शेख, रिपाईचे पंडित साळवे, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष विरेंद्र जाधव,कृष्णा लोखंडे, पंडित कटारे, राजेंद्र जाधव ,रवींद्र भदाणे, भाजपचे जिल्हा चिटणीस शरद कासार आदीसह मोठ्या संख्येने सर्व धर्मीय नागरिक तसेच सिंधी बांधव सहभागी झाले होते प्रारंभी कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष व सिंधू सेवा मंडळाचे संस्थापक भगवान कटारिया यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, जयंती अध्यक्ष विजय कुकरेजा यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधू सेवा समितीचे उपाध्यक्ष दीपक पमनानी, कार्याध्यक्ष राहुल भाटीजा, खजिनदार भरत बलवानी सह सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, युवक आघाडी प्रयत्नशील होती
#बाईक रॅली#
लाल टोप्या व स्पार्क परिधान करत युवक व महिलांनी शहरातून संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया, अंकिता कटारिया यांच्यासह अध्यक्ष विजय कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली दु.१२ वा. 'मोटर बाईक रॅली ' काढण्यात आली. या रॅलीस मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून शुभारंभ केला.यात य मंडळाचे सदस्य, समाजबांधवाणी सहभाग घेतला.
# झुलेलाल मंदिरात महाप्रसादाचे वाटप
गवळीवाड्यातील भगवान झुलेलाल मंदिरात पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्य बेहराना पूजन अर्थात ज्योत पूजनप्रसंगी सकाळी घनशाम महाराज शर्मा यांच्या पौरोहित्याखाली विश्वस्त वासुदेव बत्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पेहेलराज कुकरेजा, तिरथ वासवानी, अमित रोहेरा, विनोद चावला, आनंद कुकरेजा आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिरात सकाळी दोन तास सुनील माखिजा,महेश अहुजा,किशन अहुजा, दीपक चावला,नरेश कलाल यांनी भजन सादर केले. दुपारी भंडारा तर सांयकाळी पूज्य दर्याशाह ट्रस्टच्या वतीने उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.शिरा व चन्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी सिंधी बांधवांचा ओघ सुरु होता. मंदिराचा गाभारा हा फळांनी सजविण्यात आला होता.