गाडी क्रमांक 07363/64 हुबळी ते योगनगरी ऋषिकेश साप्ताहिक स्पेशल आता कायमस्वरूपी गाडी क्रमांक 17363/64 हुबळी योगनगरी ऋषिकेश (हरिद्वार) साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावेल.
प्रत्येक सोमवारी पहाटे 03 वाजून 10 मिनिटांनी ही गाडी मिरज स्थानकातून निघेल व परतीच्या प्रवासासाठी शनिवारी रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी मिरज येथे पोहोचेल.
त्याचबरोबर गाडी क्रमांक 06281/82 मैसूर अजमेर स्पेशल एक्सप्रेस ही गाडी नव्याने कायमस्वरूपी गाडी क्रमांक 16281/82 मैसूर अजमेर साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावेल.
योग नगरी ऋषिकेश (हरिद्वार) स्पेशल व म्हैसूर अजमेर स्पेशल ह्या गेल्या कित्येक दिवसापासून साप्ताहिक स्पेशल एक्सप्रेस म्हणून धावत होत्या. या गाड्यांना स्पेशल गाड्यांचा विशेष दर्जा देण्यात आल्यामुळे या गाड्यांचे तिकीट दरही जास्त होते. त्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाशी सातत्याने पाठपुरवठा करून सदर गाड्यांचे स्पेशल दर्जा कमी करून या साप्ताहिक गाड्या कायमस्वरूपी चालवण्यात याव्यात अशी मागणी करुन पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यास अनुसरून या स्पेशल गाड्यांना कायमस्वरूपी साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून दक्षिण पश्चिम विभागाकडून चालू करण्याचे रेल्वे बोर्ड निर्देशक संजय आर नीलम यांनी सांगितले.
हुबळी ते योगनगरी ऋषिकेश (हरिद्वार) ही गाडी सुरू झाल्यामुळे येथील भाविकांना आग्रा, मथुरा, दिल्ली, मेरठ, हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी दर्शना साठी जाण्याची सोय झालेली आहे. या गाडीस धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज जंक्शन, कराड, सातारा, पुणे, दौंड काँर्डलाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, झाशी, ग्वालियर, आग्रा कॅन्ट, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, मेरठ सिटी, मुज्जफरनगर, तापरी ,पोखरी, हरिद्वार आदी ठिकाणी थांबे देण्यात आलेले आहेत.
गाडी क्रमांक 16281/ 82 मैसूर अजमेर एक्सप्रेस ही गाडी मिरज येथून शनीवारी पहाटे 02 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून सोमवारी पहाटे 04 वाजून 35 मिनिटांनी अजमेर येथे पोहोचेल व परतीच्या प्रवासासाठी अजमेर येथून सोमवारी संध्याकाळी 06 वाजून 50 मिनिटांनी निघून बुधवारी पहाटे 01 वाजून 35 मिनिटांनी मिरज येथे पोहोचणार आहे या गाडीस ओले, नर्सिंगपुर, हसन, आर्सेकेरी, कद्दूर, दावणगिरी, कुटूर, कोपल,गदग, हुबळी, धारवाड, लोंढा, बेळगावी, घटप्रभा, मिरज जंक्शन, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, मन्सूर चित्तोडगड नरसिंहाबाद, विजानगर, भीलवाडा या ठिकाणी थांबे देण्यात आलेले आहेत.
तरी या गाड्यांच्या आरक्षणाची सोय मिरज जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून प्रवाशांनी व नागरिकांनी मिरज जंक्शन इथूनच तिकीट काढावेत व बोर्डिंग पॉईंट ही मिरज द्यावा. जेणेकरून येणार्या कालखंडामध्ये दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून आणखी काही गाड्या मिळण्याची शक्यता आहे. असे आव्हान मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.