📍 महानगरपालिका सभागृह, सांगली
🗓️ २० मार्च २०२६
वसंतदादा पाटील सभागृह येथे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच मैदानांचे विकसितकरण व खेळांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत शहरातील सर्व क्रीडाप्रेमी, खेळाडू, क्रीडा संघटक, विविध संघटना व मंडळ यांच्यासमवेत सखोल चर्चा करण्यात आली. आधुनिक सुविधा असलेली मैदाने, खेळाडूंना प्रोत्साहन देणारी धोरणे आणि युवकांना क्रीडाक्षेत्राकडे वळविण्यासाठी आवश्यक उपक्रम यावर विचारमंथन करण्यात आले. सांगली शहर क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगतीशील व सक्षम व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
यावेळी आयुक्त सत्यम गांधी, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते पृथ्वीराज पवार, भाजपा नेत्या जयश्री पाटील, स्थायी समिती सभापती अतुल माने, समाज कल्याण सभापती गीताताई पवार, विरोधीपक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक, मनपा अधिकारी, क्रीडा अधिकारी व सांगलीमधील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.