सांगली रेल्वे स्टेशनचा विकास व सांगली स्टेशन येथून नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्याबाबत मध्ये रेल्वेच्या विभागीय रेल्वे मँनेजर सोबत सकारात्मक चर्चा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/03/2026 6:13 PM

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच 
 
मध्य रेल्वे पुणे विभागीय रेल्वे मॅनेजर डि आर एम राजेश वर्मा व वरिष्ठ रेल्वे अधिकारी आज सांगली रेल्वे स्टेशन दौऱ्यावर आले. 

सांगलीतील शिष्टमंडळाने सांगली स्टेशनच्या मागण्यांसाठी त्यांना भेटून खालील मागण्यांचे निवेदन दिले.

सांगली स्टेशनवरून खालील नविन रेल्वे गाड्या सुरू करणे

1) नागपूर-सांगली वंदे भारत एक्सप्रेस
2) सांगली-चेनई एक्सप्रेस वाया हुबळी
3) सांगली-विशाखापटनम/पुरी एक्सप्रेस वाया पंढरपूर, सोलापूर, सिकंदराबाद (हैद्राबाद)
4) सांगली-तिरूवनंतपूरम एक्सप्रेस वाया लोंढा, मडगाव(गोवा)
5) सांगली-निजामाबाद एक्सप्रेस वाया लातूर
6) सांगली-हावडा एक्सप्रेस वाया लातूर, नागपूर, रायपूर
7) हुबळी-मिरज एक्सप्रेसचा विस्तार सांगली स्टेशन पर्यत करणे
8) बेळगाव-मिरज, लोंढा-मिरज, कोल्हापूर-मिरज पॅसेंजर(लोकल) गाड्यांचा विस्तार किर्लोस्करवाडी पर्यत करणे
9) कुर्डूवाडी -मिरज पॅसेंजर गाडीचा विस्तार सांगली पर्यत करणे
10) कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस सांगली मार्गे नेल्यास गाडीची तिकीट विक्री वाढेल
11) मुख्यमंत्र्यांनी मागितलेला यशवंतपूर-निजामुदीन संपर्क क्रांतीचा सांगली स्टेशनवर स्टाॅप द्यावा

सांगली स्टेशनच्या प्लॅटफाॅर्म 2 वर फुड स्टाॅल(खाद्य पदार्थ दुकान) सुरू करणे

प्लॅटफाॅर्म 1, 2, 3, 4, 5 वर एस्कलेटर (सरकता जिना) सुरू करणे

सांगली स्टेशन प्लॅटफाॅर्म 2 व 3 वर कोचिंग इंडिकेटर बसवणे

सांगली स्टेशन प्लॅटफाॅर्म 1 पासून मालधक्का प्लॅटफाॅर्म 6 पर्यत अखंड पादचारी पूल बांधणे

सांगली स्टेशनवर रेल्वे गाडीतील पाणी भरण्याची सुविधा सुरू करणे जेणेकरून सांगली स्टेशनवरून नविन गाड्या सुरु करता येतील

सांगली स्टेशनवरून सुरू होणार्या व अंत होणार्या प्रवाशी व माल गाड्यांच्या ड्रायवर, गार्ड व टिकीट साठी आराम कक्ष बांधणे

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगली रेल्वे स्टेशन बाबत सकारात्मक भूमिका घेऊन या मागण्यांवर लवकर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

या बैठकीत सतीश साखळकर, केदार खाडिलकर, विनोद दिवाणजी, शंभू राज काटकर डॉ दिलीप पटवर्धन, सचिन परांजपे, भावेश शाह  उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या