राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 18/03/2026 6:05 PM

नांदेड : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर ११ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडले. शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, साक्षरतेचे महत्त्व, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, पेंटिंग, वायरिंग, नळकाम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. राष्टसंत गुरुवर्य सतगुरू साईनाथ महाराज स्वच्छता दूत, महाराष्ट्र यांनी स्वच्छतेविषयी प्रबोधन केले. १७ मार्च २०२६ रोजी शिबिराचा समारोप झाला.

समारोप कार्यक्रमासाठी तहसील कार्यालय अर्धापूरचे तहसीलदार  रेणुकादास देवणीकर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अशा उपक्रमांमुळे व्यक्तिमत्त्व विकास घडतो व समाजाप्रती असलेली बांधिलकी दृढ होते, असे सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचे उद्योग सुरू करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करून त्यांचे मनोबल वाढवले.

संस्थेचे उपप्राचार्य व्ही. डी. कंदलवाड यांनी महादेव पिंपळगाव येथील ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

शिबिराच्या निरोप समारंभाला गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, मंगल कार्यालयाचे अध्यक्ष, ग्रामस्थ, शिल्पनिदेशक व शिबीरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डी. ए. पोतदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. बी. उभेदळ यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डी. ए. पोतदार, पी. बी. उभेदळ, जी. ए. भाकडे, ए. जी. तळोकार,  के. एस. जैन आदींनी सहकार्य केले.

Share

Other News

ताज्या बातम्या