भगूरला हिंदुत्वाची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
भगूर - हिंदू धर्मातील पवित्र सण, शुभ मुहूर्त, मांगल्याचे, प्रगतीचे, सौख्याचे, विजयाचे प्रतीक असलेला गुढीपाडवा उत्सव हिंदूंच्या दृष्टीने एक महत्त्वाचा व हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारा सण असल्याने गेल्या 12 वर्षांपासून भगूर येथील भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर येथे हिंदुत्वाची गुढी उभारून या सणाचे व नववर्षाचे स्वागत केले जाते. त्यानुसार गुढीपाडव्याला देखील 12 व्या वर्षी हिंदुत्वाची गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस ह.भ.प.गणेश महाराज करंजकर यांच्या हस्ते तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूर्तीस श्री.योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नगरसेविका अर्चनाताई बुरके, सौ.अंजली मरकड, सौ.वंदना बुरके, रोहिणी कुवर, मनस्वी बुरके, आरोही कुवर, अर्पिता कुवर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर ह. भ. प. गणेश महाराज करंजकर यांनी उपस्थित सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याचे ऐतिहासिक पौराणिक वैज्ञानिक महत्त्व विषद करून हिंदू धर्मामधील विविध परंपरा व त्यामागील वैज्ञानिक कारणे यांची थोडक्यात माहिती दिली हिंदू समाजाने आपल्या परंपरांचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी त्याचे आचरण करावे व त्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे जतन व संरक्षण करावे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे समूह गेल्या बारा वर्षांपासून धर्म संस्कृती रक्षणासाठी जो उपक्रम राबवत आहेत त्याचे देखील त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मंगेश मरकड यांनी केले. याप्रसंगी समूहाचे मुख्य संयोजक मनोज कुवर, योगेश बुरके, मंगेश मरकड, प्रशांत लोया यांचे सह उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, शिवसेना शहरप्रमुख विक्रम सोनवणे, नगरसेवक सुदाम
वालझाडे, नितीन करंजकर, उमेश मोहिते, विशाल शिरसाठ, संभाजी देशमुख, संतोष मोजाड, संदेश बुरके, दिगंबर करंजकर, दीपक गायकवाड, सुनील जोरे, प्रवीण वाघ, आशिष वाघ, शरद करंजकर, अनिल कासार, ओम देशमुख, मल्हार जोरे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.