सांगली जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक आवारात येत्या चार दिवसात तुकडे बंदी कायद्या शिथिल झाला असून 1965 ते 15 आक्टोबर 2024 च्या आतील सर्व दस्त होणार. करार पत्र, साठे खत, मुखत्यार, आदी बाबतचे दस्त करण्यासाठी नागरिकांनी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे? दस्त ऐवज कसे होणार याची सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत नियमावली ( SOP ) माहिती फलक लावावेत अशी मागणी जयहिन्द सेने कडून करण्यात आली होती. त्या बाबत मा. जिल्हाधिकारी काकडे, मा. जिल्हा मुद्रांक अधिकारी प्रमोद कदम, मा. श्रीराम कोळी, पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, मनोज भोरे, यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयातून सर्व दुय्यम निबंधकांना परिपत्रक काढून सूचना देण्यात आल्या आहे..
जय हिंद सेनेकडून मा. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा मुद्रांक धिकारी मा. प्रमोद कदम, मा श्रीराम कोळी यांचे जय हिंद सेने कडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले.