5 मार्च रोजी जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह होणार साजरा

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 05/03/2026 7:51 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि.: राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी ३ मार्च हा जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह साजरा केला जातो. त्या अनुषंगाने दि. 5 मार्च २०२६ रोजी जागतिक कर्णबधिरता दिन व सप्ताह साजरा करण्यात येणार असून सदर सप्ताहा निमित्त रुग्णालयामध्ये येणा-या रुग्णांची कान, नाक व घसा तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच जिल्हयातील सर्व शासकिय आरोग्य संस्थांमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा नर्सिंग कॉलेज येथे जनजागृती पोस्टर स्पर्धेचे आयोजन करुन तेथील विदयार्थीनींसाठी कान, नाक, घसा आजार व उपचार याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कान, नाक, घसा विभाग जिल्हा रुग्णालय, सातारा येथे संपर्क करणेबाबतचे अवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या