*'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' कार्यसमितीमध्ये जेष्ठ समाजसेवकांना देखील सहभागी करा - नाशिकभूषण अमोलभाऊ भागवत.*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 04/03/2026 5:08 AM

*'सिंहस्थ कुंभमेळा २०२७' कार्यसमितीमध्ये इतर सामाजिक क्षेत्रातील जेष्ठ समाजसेवकांना देखील सहभागी करा - नाशिकभूषण  अमोलभाऊ भागवत.*    
          *अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी असलेल्या कार्यसमिती मध्ये विविध क्षेत्रातील अनुभवी, जेष्ठ व सक्रीय समाजसेवकांना सामिल करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.. या संबंधी कुभमेळा समिती अध्यक्ष, नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्यासह सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच नाशिक जिल्हाधिकारी भा.प्र.से. आयुष प्रसाद यांची देखील सहमती घेऊन नाशिक प्रभारी पालकमंत्री यांना याबाबत पत्र देऊन ह्यामधील उपयुक्तता स्पष्ट करण्यात आली.*
          *यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ, जनसेविका गिताताई शामसुका, डॉ. पार्वती लकारिया, तालुकाध्यक्ष सविताताई आहेर, शिवसेना नेत्या रंजनाताई थोरवे, शहरप्रमुख जावेदभाई शेख, जनसेविका आशाताई भोईर, जनसेविका सुनंदाताई विस्पुते, दिव्यांग जिल्हाध्यक्ष सूरदास पावसे, जनसेवक विष्णू भाऊ कातोरे, जनसेविका वंदनाताई काळे, श्री अनिल पऱ्हे, सचिव श्यामभाऊ जाधव, अमोल पवार, शहरप्रमुख जावेदभाई शेख, उपाध्यक्ष दिलीपभाऊ गायकवाड, मा. तुषारजी शामसुका, दर्शना संदिप आहिरे, सुलोचना विलास शिंदे, संघटक सुवर्णाताई उदावंत, जनसेविका दिपालीताई वाणी, कलाधयक्ष संजय बलकवडे, श्यामभाऊ डावरे, राहुल मोरे, तानाजी भोज, संजय शिंदे, विशाल आर, सुनील पाटील, बाळासाहेब साळवे, दिनेश गवारे उपस्थित होते.* *सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी सोई-सुविधा या क्षेत्रांच्या विकासाला चालना मिळावी याची दखल घेणे अत्यावश्यक आहे ही मागणी राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांच्यासह सर्वसमाजसेवकांनी केली*
          *कुंभमेळा 2027 च्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन किंवा विशेष 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण' नियुक्त समितीमध्ये  अनुभवी समाजसेवकांना सामिल करावे अशी सर्वसामान्य जनतेची व सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींची असलेली योग्य इच्छा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली.* 
          *(NTKMA) नुसार पायाभूत सुविधा विकास, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, सुरक्षा व संरक्षक व्यवस्था, वाहतूक व गतीशीलतेचे नियोजन, डिजिटल सक्षमकरण, भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यास सहकार्य करू, लाखो भाविक व पर्यटकांना सुरक्षित, सर्वसमावेशक व समृद्ध असा अनुभव देण्यासाठी आम्ही समाजसेवक कार्यशील असू असे आश्वासन उपस्थितांकडून देण्यात आले.*
.

Share

Other News

ताज्या बातम्या