'कोलाज भावनांचा' काव्यसंग्रहात अंतर्मनातील कल्लोळ : देवीदास फुलारी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 02/03/2026 6:09 PM

नांदेड : कवयित्री रुचिरा बेटकर यांचा 'कोलाज भावनांचा' हा काव्यसंग्रह मानवी भावनांच्या विविध छटा, प्रेमाची सुक्ष्म जाणिवा आणि अंतर्मनातील कल्लोळ शब्दरंगांनी उलगडतो, असे प्रतिपादन अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देवीदास फुलारी यांनी केले.
मसाप शाखा नांदेड आणि इसाप प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शिवाजीनगर येथे रुचिरा बेटकर यांच्या या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर, कवी डॉ. पी. विठ्ठल आणि बालाजी इबितदार उपस्थित होते. डॉ. किन्हाळकर यांनी, स्त्रिया व्यक्त होतात अश्रूतून किंवा शब्दांतून; त्यांना समजून घेणारे कोणीतरी आवश्यक असते. व्यक्त होणे, हेच त्यांच्या अस्तित्त्वाचे विधान आहे, असे सांगितले. तर त्यापुढे बोलताना म्हणाले स्त्रियांनी लिहीत होणार अत्यंत आवश्यक आहे रुचिरा बेटकर यांनी मांडलेल्या भावना या निर्मळ निर्भीड आणि निस्वार्थ मनाने मांडलेले आहेत स्त्री मनातील कोलाज सोडून त्यांनी कागदावर उमटवलेले शब्द अत्यंत भावनिक असल्यामुळे ती माणसाच्या मनात प्रेम निर्माण करते असे त्या म्हणाल्या.
डॉ. पी. विठ्ठल यांनी रुचिरा यांच्या कवितेत प्रेम, आत्मभान, आत्मसन्मान आणि मानवी नात्यांची जडणघडण स्पष्ट दिसते, तसेच त्यात स्त्रीविषयक सकारात्मक उर्जा आहे, असे नमूद केले.
रुचिरा बेटकर म्हणाल्या, आयुष्यातील अनुभवांना शब्दरूप देणे, हा माझा प्रयत्न आहे; या संग्रहातून भावनांचा कल्लोळ वाचकांपर्यंत पोहोचविला आहे. प्रास्ताविक प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले, तर सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले. यावेळी साहित्य रसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या