कुपवाड मेन रोड पाण्याची टाकी ते जकात नाका 1 कोटी 7 लाख निधी मंजूर रस्त्याच्या कामाला आज सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
कुपवाड मधील मेन रोड पाण्याची टाकी ते जकात नाका पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब होता. या रस्त्या संदर्भात आमचे सहकारी मा.दाऊद मुजावर अल्पसंख्यांक शहर जिल्हा उपाध्यक्ष व कुपवाड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून सां.मि.कु.महानगरपालिका कुपवाड कार्यालायचे सहायक आयुक्त यांना निवेदन दिले होते. निवेदन देऊन ही रस्त्याचे काम केले जात नव्हते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगली मनपा कार्यालय समोर धरणे आंदोलन केले होते. तसेच मागील चार ते पाच महिने या रस्त्या करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून पाठपुरावा करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड टीमच्या निवेदन, आंदोलनाला तसेच पाठपुराव्याला यश आले. या रस्त्याच्या कामा करिता 1️⃣ कोटी 7️⃣ लाख रुपये मंजूर झाले आहे. आणि आज या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
या रस्त्याच्या काम आज चालू झाले आहे. त्यावेळी आम्ही सर्व प्रत्यक्ष राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित राहून. सदर कॉन्ट्रॅक्टर श्री कुंभार यांना चागल्या पद्धतीने या रोडचे काम झाले पाहिजे. आशा सक्त सूचना करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी पार्टी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, अल्पसंख्यांक शहरजिल्हा अध्यक्ष मुनीर मुल्ला, अल्पसंख्यांक शहरजिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर, राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागर माने, कुपवाड कार्याध्यक्ष अरुण रुपनर (तात्या), अल्पसंख्यांक शहरजिल्हा युवक शहर जिल्हा सरचिटणीस मुद्दसर मुजावर, युवक कुपवाड शहराध्यक्ष दादासाहेब कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खोत, सांगली विधानसभा कुपवाड अध्यक्ष संजय तोडकर, युवक कुपवाड कार्याध्यक्ष अजय कोरे, प्रहार संघटनेचे नेते गोरख व्हनखडे, निसार मुजावर, अरबाज मुल्ला, अमन आठवले, हर्षद उबाळे इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.