कवलापूर येथे लवकरच कार्गों विमानतळाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/09/2025 9:55 PM

कवलापूर येथे लवकरच कार्गो विमानतळाचे स्वप्न साकार होण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आज उद्योग मंत्री मा नाम उदय जी सामंत यांच्या दालनात मीटिंग संपन्न झाली सदर मिटिंग मध्ये पालकमंत्री मा.नाम चंद्रकांत दादा पाटील जिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.            
पुढील मीटिंग 7 ऑक्टंबर 2025 रोजी संबधित सर्व खात्याचे शासकीय सचिव अधिकारी लोकप्रतिनिधी यांची व्यापक मीटिंग संपन्न होणार आहे.                       प्रस्तावित कार्गो विमानतळ असल्यामुळे जास्तीची जागा लागणार नसून आत्ताचे उपलब्ध जागा व त्यात 50 एकर नवीन ची जागा लागेल आणि सांगली जिल्ह्यातील विमानतळाचे स्वप्न पूर्ण होईल अशी अशा या निमित्ताने पल्लवीत झाली आहे जिल्ह्यातील उत्पादक क्षमता बघता प्रक्रिया उद्योग यायचे असतील तर कार्गो विमानतळ आवश्यक आहे जिल्ह्यातील उद्योगधंदे वाढीस लागण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी व सांगली जिल्ह्यातील आर्थिक उन्नती होण्यासाठी सदर विमानतळ आवश्यक आहे याबाबत प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी मंत्री प्रशासकीय अधिकारी यांना लागेल ते सहकार्य करण्याची तयारी कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीची राहणार आहे

Share

Other News

ताज्या बातम्या