बेवारस अवस्थेतील पित्याची शोकांतिका: सावली बेघर निवारा केंद्रातील वास्तव.... दीनदयाल अंतोदय नागरिक उपजीविका अभियान व सांगली महानगर पालिका अंतर्गत चालवले जाणारे सावली बेघर निवारा केंद्र सांगली मधील सत्य कथा......
जगात नाती सर्वकाही असतात, असे म्हटले जाते. पण काहीवेळा हीच नाती जबाबदारी झटकून पाठी फिरवतात, आणि माणूस बेवारसपणे जगण्यास आणि शेवटी मरण्यासही भाग पाडला जातो.
असाच एक हृदयद्रावक प्रसंग नुकताच सावली बेघर निवारा केंद्र, सांगली येथे घडला.
एक वयोवृद्ध व्यक्ती — पित्याला लखवा (पक्षाघात) झालेला, मुलगी मनोरुग्ण त्या मुलीचे पुनवर्सन इन्साफ फौंडेशन कडून एका चांगल्या संस्थेत करण्यात आले , मुलगा चांगला पण परिस्थितीसमोर हतबल, आणि समाजाने त्यांना ‘बोजा’ म्हणून टाकून दिले. शेवटी या वृद्ध पित्याने भीक मागून आपले आयुष्य चालवले. रस्त्याच्या कडेला, समाजाच्या दृष्टीआड जगत असताना त्यांना सावली बेघर निवारा केंद्र मध्ये स्थान मिळाले.
पाच वर्ष त्यांनी तिथे आश्रय घेतला. कोणतीही तक्रार नाही, फक्त एक आशा – की कधीतरी नाती त्यांना परत स्वीकारतील.पण नाती हि केवळ दाखवण्यासाठी असतात ते पण काही काळा पुरते ते पण काळातराने मरण पावतात ते आजोबा
आज ते मरण पावले, आणि त्यांच्या मृतदेहासमोर तेच भाऊ, भाऊजी, नातेवाईक अश्रू ढाळताना दिसले – परंतु हे अश्रू खरे होते की नाटक?
पाच वर्षं जिवंत असताना कोणीही फिरकले नाही, एक औषध आणले नाही… आणि आता मरणानंतर लाचारीने, नाटकबाज अश्रूंसह त्यांच्याकडे पाहणं – ही समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
सावली निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्या वृद्धासाठी पाच वर्षं कुटुंबासारखी सेवा दिली. आज त्यांच्या जाण्याने केंद्रात एक पोकळी निर्माण झाली आहे, पण जिवंतपणी मिळालेला आधार कदाचित त्या वृद्धासाठीचं खरे नातं ठरले.
या घटनेतून शिकण्यासारखं म्हणजे –
नाती केवळ रक्ताच्या नाही, तर माणुसकीच्या असावीत.
आणि माणूस जिवंत असताना त्याची किंमत ओळखायला हवी, मृत्यूनंतर नव्हे.
ही सत्यकथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर अनेक बेवारस, दुर्लक्षित वृद्धांची आहे. त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था म्हणजेच आपल्यासाठी खरी माणुसकी जपणारी मंदिरं आहेत. शेवटी माझ्या मनाला वाटले की अरे तसु...... माझ्या जवळ होते तेवढे तुझ्या बापाला दिले मला माफ कर तुला तूझ्या बापाचे शेवटचे दर्शन पण देऊ शकलो नाही.......
सावली बेघर निवारा केंद्र सांगली,
इन्साफ फौंडेशन सांगली 9021516176