जलसमाधी आंदोलनात आंदोलन कर्त्याला वाचवण्यात आयुषला यश आले.
शिवसेनेच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान एक हृदयद्रावक प्रसंग घडला.
कृष्णेच्या तीव्र प्रवाहात एक तरुण आंदोलन करता वाहून जात होता.
त्याला वाचवण्यासाठी इतर दोन शिवसैनिकांनीही पाण्यात उड्या घेतल्या, पण पाण्याचा अंदाज न आल्याने तेही अडचणीत सापडले.
अशा गंभीर परिस्थितीत, आयुष हेल्पलाइनची आपत्कालीन टीम तात्काळ धावून आली! घटनेचे गांभीर्य ओळखून, अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखालील आयुष टीमने सुरज शेख, नरेश पाटील, रुद्रप्रताप कारंडे, अजित कांबळे, रेहान मुल्ला, निहाल बावा यांनी तात्काळ बोट घटनास्थळी नेऊन पाण्यातून वाहत जाणाऱ्या त्या तरुणाला आणि इतर दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.
आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील देखील या बचावकार्यात उपस्थित होते.
आयुष हेल्पलाइनच्या या जलद आणि धाडसी कार्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे!