आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
मसवड दि:वाकी वरकुटे ता. माण येथील बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही लोक तीन पाणी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तत्काळ वाकी वरकुटे येथील बनवस्ती या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाने गुन्हा दाखल केले असून यामध्ये एक लाख 72 हजार 290 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील आरोपी धनाजी रामचंद्र कोके,
सत्यवान रामहरी चव्हाण, गणेश भास्कर चव्हाण, सुनील दत्तात्रय माने,भास्कर भानुदास चव्हाण, दादा भानुदास चव्हाण,सुरज जगन्नाथ लोखंडे, हे सर्वजण राहणार बनवस्ती वाकी वरकुटे
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी ,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, अमर नारनवर, रूपाली फडतरे , नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, वसिम मुलानी, विनोद सपकाळ, महावीर कोकरे यांनी केली आहे.
: म्हसवड पोलीस स्टेशन येथे जोगाऱ्यांसमवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व स्टाफ