महावितरणकडून ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम, रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ठेका रद्द?

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/07/2025 2:21 PM

प्रति 
1) मा. नाम. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
2) मा. नाम. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा 
3) मा. जिल्हाधिकारी सांगली जिल्हा
4) मा.अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी सांगली जिल्हा 
5) मा. कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी सांगली

विषय:- सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना रीडिंग घ्यायला माणसं नसल्याचे कारण सांगून अवरेज बिल आकारले जात असले बाबत....

महोदय,

सध्या सांगली जिल्ह्यामध्ये वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे सदर स्मार्ट मीटर बाबत नागरिकांच्या फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे 
विधानसभा निवडणुका पूर्वी अधिवेशनाच्या काळात तात्कालीन ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सदर स्मार्ट मीटर बाबत स्थगिती दिली होती.
मात्र पाशवी बहुमत मिळवून सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे शेजारील उत्तर प्रदेश बिहार राज्यांमध्ये सदर स्मार्ट मीटरमुळे तीन ते चार पट विज बिल वाढवून आल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अशा स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्या सर्व ग्राहकांना वाढी विज बिल आलेले आहेत त्यामुळे सदर मीटर बसवण्याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे हे आपण सुद्धा जाणून असताना जाणीपूर्वक वीज मीटरचे रीडिंग येणारे कर्मचारी अथवा ठेका रद्द करून वीज ग्राहकांना आवरेज दिले देऊन वेठीस धरण्याचे काम महावितरण कडून चालू आहे 
याबाबत तात्काळ वीज रीडिंग घेणाऱ्या कर्मचारी अथवा मक्तेदाराकडून परत वीज रिडिंग घेण्याचे काम चालू करावे अन्यथा आपल्या कार्यालय समोर आम्हाला धरणे आंदोलन अथवा अन्य पद्धतीने आंदोलन करणे भाग पडणार आहे व त्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी महावितरण जबाबदार असणार आहे 
तरी आजच्या आज तात्काळ अवरेज वीज बिल देणे बंद करून रीडिंग घेऊन रीतसर बीले देण्यात यावीत अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या