सांगली: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब ,युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या सूचनेनुसार आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सांगलीतील स्टेेशन रोड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके, उत्तम कांबळे, अनिता पांगम ,महालिंग हेगडे ,डॉ शुभम जाधव, वैशाली धुमाळ, विद्या कांबळे, संगिता जाधव ,छाया पांढरे ,विश्वास लोंढे, राहुल यमगर ,चांदणी आवळे ,पुष्पा चव्हाण,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.