*चंन्द्रपुर : कोविड वार्डात सीसीटीव्ही लावण्याचे : पालकमंत्र्यांचे आरोग्य विभागाला निर्देश* *कोरोना संदर्भात आढावा बैठक*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 15/09/2020 10:33 PM



चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर: कोरोना बाधितांवर कोविड रुग्णालयात योग्य उपचार सुरूआहेत याची खात्री पटण्यासाठी आणि उपचार घेत असलेल्या वार्डातील बाधितांच्या नातेवाईकांना दिलासा मिळावा म्हणून कोविड वार्डात सीसीटीव्ही लावण्याची व्यवस्था करावी, अशा सुचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एन. मोरे तसेच  विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या काळात रुग्णांना सेवा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. रुग्णांवर वेळेत योग्य ते उपचार व्हावे यासाठी बाहेरून मनुष्यबळ मागविण्यात येणार असल्याचेही श्री. वडेट्टीवार म्हणाले.

रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांबद्दल योग्य ती माहिती वेळेत मिळावी यासाठी रुग्णालयात माहिती कक्ष तातडीने स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. स्वतःच्या रुग्णाबद्दल विचारणा करण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना योग्य ती माहिती वेळेत मिळावी यासाठी स्टिकर्स, फलकांच्या माध्यमातून वार्ड मध्ये कोणते डॉक्टर सेवा देत आहे याची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी आरोग्य विभागाला दिल्यात.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोविड वार्ड मध्ये नोडल अधिकारीची नेमणूक करण्यात यावी.   त्यासोबतच कोविड वार्डात रूग्णाची ओळख पटविण्यासाठी रुग्णाला व त्याच्या बेडला विशिष्ट नंबर  देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्यात.


Share

Other News

ताज्या बातम्या