ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अप्रवृत्ती द्वारे कर्तव्यदक्ष अधिकार्याचा मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न(पं.स.चा मासीक सभेत कृतीचा निषेध तर अधिकार्याचा गूणगौरव)

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/15/2020 4:29:29 PM

कुरखेडा :- 

         येथील पंचायत समिति अंतर्गत कार्यरत कर्तव्यदक्ष महिला व बालविकास प्रकल्प अधिकार्याचा विरोधात काही अप्रवृत्ती द्वारे निराधर व खोटे आरोप लावत त्याचे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रकार सूरू आहे या अप्रवृत्तीचा निषेधाचा ठराव नूकताच येथील प.स.चा मासीक सभेत सर्वानूमते पारीत करीत संबंधित कर्तव्यदक्ष अधिकार्याचा कार्याची दखल घेत त्याचा गूणगौरव करण्यात आला व शाल श्रीफळ देत सभागृहातच त्याचा सत्कार सूद्धा करण्यात आला
        पंचायत समिति कूरखेडा येथे मागील सहा महिण्यापूर्वी गणेश कूकडे हे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झाले रूजू होताच त्याना कोरोनाचा कठीन काळात आपले कर्तव्य बजवावे लागले या परीस्थीत सूद्धा त्यानी विभागा अंतर्गत संचालित अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांचा कूपोषण मूक्ती करीता राबविण्यात येणार्या सकस आहार पूरवठा योजणा बाबद वेळोवेळी आढावा घेत प्रत्येक्ष सूद्धा अनेक लाभार्थांशी संवाद साधला आहार खर्या लाभार्थापर्यत पोहचते की नाही ते सूनिश्चीत केले मात्र त्यांचा याच कर्त्तव्य दक्षतेचा त्रास काही अप्रवृत्ती ला झाल्याने त्यानी त्याचा विरोधात निराधार व खोट्या तक्रारीचा सपाटा लावला या प्रकाराने माझे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे अशी कैफीयत प्रकल्प अधिकारी गणेश कूकडे यानी सभागृहा समक्ष मांडताच माजी सभापति तथा प स सदस्य गिरीधर तितराम यानी अधिकार्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणार्या मनोवृत्तीचा निषेध करणारा ठराव सभागृहात मांडला सभागृहाने एकमताने त्यास पाठिंबा दिला तसेच सभागृहाचा वतीने त्या अधिकारी चा कामाची दखल सूद्धा घेण्यात आली व सभागृहातच त्याचा कामाचा गूणगौरव करीत शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला यावेळी प स सभापति सूनंदा हलामी उपसभापति श्रीराम दूगा संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग प स सदस्य गिरीधर तितराम, मनोज दूनेदार संध्या नैताम माधूरी मडावी शारदा पोरेटी कविता गूरनूले तसेच पंचायत समिति चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.नितीन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक)
9404231937

Share

Other News