एन डी आर एफ टीम सांगली मध्ये दाखल ,
पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस या मुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे,आता आयर्विन पूल येथे 27.4इतकी पातळी झाली आहे
सांगली येथील सूर्यवंशी प्लॉट मध्ये 30 फूट पाणी पातळी वेळी रहिवाशी भागात पुराचे पाणी येते ,ही बाब लक्षात घेऊन पूर बाधित रहिवाशी यांचे शाळा नंबर 3 व शाळा नंबर 17 (हिंदू मुस्लिम चौक) या ठिकाणी निवारा केंद्र मध्ये स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे.जनावरांसाठी बदाम चौक, फिश मार्केट शेजारील मैदान तसेच सम्राट व्यायाम मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड वरील मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे
प्रशासन वतीने पूर बाधित रहिवाशी यांची निवारा केंद्रां मध्ये गरजेनुसार स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती अति आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे. पाण्याची पातळी वाढत जाईल त्या नुसार त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे. तश्या सूचना देखील देण्यात येणार आहेत.
तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.