जिल्हा परिषद बांधकाम वडूज विभागातील उपविभागीय अभियंता जितेंद्र खलीपे ACB च्या जाळ्यात

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 28/03/2024 6:34 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे 


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये संबंधीत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
२६ : ३ : २०२४ रोजी :  जितेंद्र राजाराम खलीपे वय-५१, व्यवसाय उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वडूज, जि. सातारा वर्ग १ सध्या रा. पेडगाव रोड, वडूज ता. खटाव जि. सातारा. मुळ रा.जैन मंदिराजवळ, उभी पेठ, विटा, ता. खानापूर, जि. सांगली
६८,०००/- रुपये.
रक्कम पैकी
५०,०००/- रुपये. स्विकारताना ACB च्या जाळ्यात..

यातील सविस्तर माहिती पुढील प्रमाने तक्रारदार यांचा अर्थमुव्हर्स व डेव्हपर्स चा व्यवसाय असून त्यांच्या नावाने असलेल्या आदर्श फर्मच्या वतीने पंचायत समितीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे अंतर्गत केलेल्या तीन रस्त्यांचे काम व एक समूह गांडूळ निर्माती शेडचे असे एकूण चार कामाचे काम पुर्ण केल्याचा दाखला देणे करीता यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण रूपये ३४,००,०००/- बिलाच्या दोन टक्के प्रमाणे ६८,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती रूपये ५०,०००/- ची लाच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले असून यांना ताब्यात घेण्यात आले असून वडूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे

कारवाई पथकाची टिम पुढील प्रमाण…..१. पो.नि. सचिन अंकूश राऊत, ला.प्र.वि. सातारा.
२. पो.नि.विक्रम शिवाजी पवार, ला.प्र.वि. सातारा.
३. पो.हवा. गणेश ताटे, ला.प्र.वि. सातारा.
४. पो.ना. निलेश चव्हाण, ला.प्र.वि. सातारा.
५. स.पो.उप. निरीक्षक शंकर सावंत, ला.प्र.वि. सातारा.
६. पो.हवा. नितीन गोगावले, ला.प्र.वि. सातारा.७. म.पो.ना. प्रियांका जाधव, ला.प्र.वि. सातारा.
८. पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, ला.प्र.वि. सातारा.
९. चा.पो.ना मारूती अडागळे ला.प्र.वि. सातारा मार्गदर्शक अधिकारी : राजेश वसंत वाघमारे, पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा.


Share

Other News

ताज्या बातम्या