कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार विरोधात सिल्लोड शहर पोलीस स्टेशन येथे तब्बल पाच फौजदारी तक्रारी दाखल.*

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 10/02/2024 8:08 PM



कॅबिनेट अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या विरोधात दिनांक 08.02.2024 रोजी सिल्लोड शहर पोलीस स्टेशन येथे तब्बल पाच फौजदारी तक्रार दाखल करण्यात आलेले आहेत. परवा झालेल्या अनोख्या व आगळ्यावेगळ्या ''शासनाची वरात''बँड बाजा, ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी सह रथामध्ये तक्रारदारांची मिरवणूक काढून या तक्रारी दाखल करण्यात आलेले आहेत. सदर तक्रारीत नमूद केलेले आहे की, मंत्री अब्दुल सत्तार हे कृषिमंत्री असताना सन 2022 डिसेंबर महिन्यात सिल्लोड सर्वे नंबर 90, 91 व 92 मध्ये महाराष्ट्र कृषी महोत्सव साठी जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले होते. आणि तिथे दिनांक 01 जानेवारी ते 07 जानेवारी 2023 पर्यंत कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. जमिनीचे सपाटीकरण करताना सर्वे नंबर 92 मधील वारिस देशमुख यांच्या प्लॉटिंग मधील तब्बल 205 प्लॉट धारकांच्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले. सपाटीकरण करताना नागरिकांच्या प्लॉट/ भूखंड यांच्या खाणा-खुणा, हद्दी, मार्किंग, कंपाउंड, बेसमेंट इत्यादी चे सुद्धा सपाटीकरण करण्यात आले होते. कृषी प्रदर्शन झाल्यावर दोन महिन्यानंतर अचानक सर्वे नंबर 92 मध्ये अब्दुल सत्तार यांची शैक्षणिक संस्था नॅशनल एज्युकेशन सोसायटी मार्फत हॉस्पिटलचे बांधकाम सुरू करण्यात सुरू झाले. सदर बांधकाम जवळपास 60 ते 70 भूखंड/ प्लॉट धारक यांच्या मालमत्तेवर होत आहे, असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार जाबीर खान पठाण रा. छत्रपती संभाजीनगर यांचा प्लॉट क्रमांक 114 असून पठाण हे निवृत्त भारतीय सैन्य दलातील सैनिक आहेत. दुसरे तक्रारदार अप्पाराव गिरजुबा गोराडे रा. निल्लोड यांचा प्लॉट क्रमांक 85 असून, त्यांचा मुलगा योगेश गोराडे भारतीय सैन्य दलात सेवेत असून, त्यांनी त्यांच्या विभागात तक्रार दिली होती. परंतु राजकीय दबावात जिल्हाधिकारी यांनी काहीच कार्यवाही केली नाही असा त्यांचा आरोप आहे. तिसरे तक्रारदार सौ. पुतळाबाई देवचंद बरसावणे रा. छत्रपती संभाजीनगर यांचा प्लॉट क्रमांक 106 आहे. चौथे तक्रारदार रुखमाबाई भिकन लोंधे रा. बनकिन्होळा यांचा प्लॉट क्रमांक 132 असा आहे. व पाचवे तक्रारदार महेश शंकरलाल शंकरपेल्ली रा. सिल्लोड यांचा प्लॉट क्रमांक 102 असा आहे.
मंत्री अब्दुल सत्तार विरोधात एकाच दिवशी पाच फौजदारी तक्रार दाखल झाल्याकारणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदारांनी मागणी केली आहे की, पोलीस प्रशासनाने अगोदर प्राथमिक चौकशी/ तपास करावा तसेच आम्ही दिलेले सर्व पुरावे व प्राप्त पुरावा आधारे दोष सिद्धी अंती गुन्हा दाखल करावा. नागरिकांचे प्लॉट बळकावल्या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत नक्कीच भर पडणार आहे. सदर प्रकरणात तथ्य आढळल्यास अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे सरकार वरील मंत्र्यांवर सातत्याने असे गंभीर आरोप होत असल्याकारणाने शिंदे सरकारची प्रतिमा महाराष्ट्रात मलीन होताना दिसत आहे.


*शंकरपेल्ली यांची बाईट*
सिल्लोड तालुक्यात मंत्री अब्दुल सत्तार मार्फत कित्येक गोरगरीब लोकांच्या प्लॉट, मालमत्ता, जमिनी हडप करण्यात आलेले आहेत. सिल्लोड शहरात माझ्या देशाच्या दोन सैनिकांच्या मालमत्ता बळकावण्यात आलेले आहेत. जर माझ्या शहरात देशाच्या सैनिकांचीच मालमत्ता सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांची सुरक्षा कोण करेल? शिंदे सरकारकडे माझी मागणी आहे की, सामान्य जनतेला आपण न्याय देणार नसाल तर किमान देशाच्या सैनिकांना तरी न्याय द्या. म्हणजे तुमची वास्तविक देशभक्ती खरे हिंदुत्व महाराष्ट्राला दिसून येईल.

Share

Other News

ताज्या बातम्या