यावल पंचायत समितीत पशुपालक शेतकऱ्यांसाठीची शेळीपालन गोठा योजना बंद मुन्ना पाटील यांची पालकमंत्री यांच्याकडे तक्रार

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 28/11/2023 6:29 PM

यावल ( प्रतिनिधी ) येथील पंचायत समिती यावलच्या माध्यमातुन राज्य शासनाची ग्रामीण क्षेत्रातील पशुपालक शेतकरी व नागरीकांच्या लाभासाठी नवसंजीवनी ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत शेळी पालन शेड ( गोठा ) उभारणी अनुदान ही योजना मागील एक ते दिड वर्षा पासुन बंद असल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये यावल पंचायत समितीच्या उदासीन कारभारामुळे ग्रामीण जनतेत नाराजी पसरली असुन या बाबतची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार मुन्ना उर्फ पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे .                                  या संदर्भात शिवसेना ( शिंदे )गटाचे पदधिकारी तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील महायुती शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पशुपालक शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेता मागेल त्याला शेळीपालन शेड उभारणीसाठी १०० % टक्के अनुदान योजना ही युद्धपातळीवर राबविली जात असुन,असे असतांना यावल पंचायत समितीच्या उदासिन व भोंगळ कारभारामुळे मागील एक ते दिड वर्षापासुन पशुपालक शेतकरी नागरीकांचे गाय म्हशी शेळीपालन शेड ( गोठा )उभारणी योजना मागणी साठी चे अर्ज स्विकारले जात नसल्याने पंचायात समिती यावल गटविकास अधिकारी व त्यांचे अधिकारी सहकारी यांच्या योजना अमलबजावणी बाबत उदासीन व भोंगळ कारभारा बद्दल नाराजी व्यक्त होत असल्याने शेतकरी हिताची ही योजना तालुक्यातील शेतकरी व शेळीपालन करणाऱ्या नागरीकांसाठी पुनश्च सुरू करावी व योजना अमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकारी यांच्यावर त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांचे कडे केली असल्याचे म्हटले आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या